| नरवीर.तानाजी काळोजी मालुसरे | |
|---|---|
तानाजी मालुसरे यांचा अर्ध-पुतळा | |
| टोपणनाव: | तान्हाजी |
| जन्म: | इ.स. १६२६ गोडवली, सातारा , महाराष्ट्र, भारत |
| मृत्यू: | ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत |
| वडील: | काळोजी मालुसरे |
| आई: | पार्वती मालुसरे |
| पत्नी: | सावित्री मालुसरे |
तानाजी मालुसरे (१६२६, गोडवली, सातारा - ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड किल्ला) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.[१] तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता..[२] नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या आंबेशिवथर गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी व गावातील शहरात असणाऱ्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेऊन आपल्या वैयक्तिक निधीतून उभे करण्यात आले आहे. हे स्थान महाड पासून 30 किलोमीटर अंतरावर निसर्ग स्थानिद्यात आहे.[ संदर्भ हवा ]
सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले. लहान पणापासूनच डोंगरदऱ्यांची माहिती असलेला हा तरुण. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरठ म्हणजेच त्यांचा शेलारमामा यांच्या गावी गेले.[ संदर्भ हवा ]
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.[ संदर्भ हवा ]
तानाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मढे घाट म्हणतात. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठ या गावात येऊन ते राहिले होते. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.[ संदर्भ हवा ]
सिंहगडची लढाई फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड किल्ल्यावर (त्या काळात कोंधना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढिन्या)रात्री दरम्यान झाली. मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात लढाई झाली. वेढा घेण्याच्या वेळी तानाजीने यशवंती नावाच्या घोरपडच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पॊचला.
गडावर चढताना मराठ्यांना पहारेकऱ्यांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व काही घुसखोर यांच्यात लढाई झाली. उदयभान आणि तानाजी एकाच युद्धात गुंतले. उदयभानने तानाजीची ढाल फोडली आणि त्याची भरपाई केली. त्याने त्याच्या शेजारीच आपल्या पगडीचे कपड लपेटले आणि लढाई सुरूच ठेवली, लवकरच थोड्यावेळ उदयभानने त्याचा कवच तोडले. पण तानाजीने त्याचा सामना केला, ते दोघे युद्धामध्ये मारले गेले. दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला.[३]
तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.[ संदर्भ हवा ]